पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुलाचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवाल आणि अशफाक मकानदार याला अटक केली असून या तिघांना पोलीस कोठडीत 14 जून पर्यंत वाढ केली आहे.
मुलाच्या रक्ताचे नमुने कुठे आणि कोणी फेकले अजून कोणाचा या प्रकरणात सहभाग आहे का ही सर्व माहिती गोळा करण्यासाठी या तिघांचा कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. नमुने बदलण्यासाठी 4 लाख रुपये देण्यात आले मात्र त्यापैकी 3 लाख रुपये डॉ. हळनोर यांचा कडे मिळाले.
आरोपी अश्फाक मकानदार हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता त्याला कोणी मदत केली तो कुठे होता याचा तपास पोलीस करत आहे.
या प्रकरणात मुलाच्या आई वडील यांनी रक्ताचा नमुना नष्ट केल्याचा दाट संशय आहे. मुलाच्या आई वडिलांना आधी 10 जून पर्यंत कोठडी सुनावण्यात आली असून काल त्याची मुदत संपली म्हणून न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 14 जून पर्यंत वाढ करून दिली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु.एम. मुधोळकर यांनी पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले.