राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याने भाजपचे नेते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात त्यांच्याच कार्यालयात शिरून मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आंबेकर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. आंबेकर हे भाजपचे प्रवक्ते आहेत. त्यांनी पुणे पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या 20 कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयात मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचे खासदार गिरीश बापट यांनी पवारांच्या विरोधात केलेल्या पोस्टबद्दल माफी मागण्यास सांगितल्याचा आरोप आंबेकर यांनी केला.
भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते विनायक आंबेकर यांना दोन दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी एक कविता पोस्ट केली होती. त्या कवितांच्या काही ओळींवर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत विरोध दर्शविला असून राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन दमदाटी करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून खडक वासला पोलिसांनी याची नोंद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयात या प्रकरणात कोणाला अटक केली नाही.
विनय आंबेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मारहाण करायला लावल्याचा आरोप काकडे यांच्यावर केला आहे. माझ्या कवितेच्या काही ओळीतील शब्द चुकीचे होते. ते मान्य करत मी माफी देखील मागितली. मात्र तरीही अंकुश काकडे यांनी काही कार्यकर्त्यांना पाठवून मारहाण करायला लावली असं म्हटलं आहे. खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.