Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 March 2025
webdunia

पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात सिगारेट आणि दारूच्या बाटल्या सापडल्या

पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात सिगारेट आणि दारूच्या बाटल्या सापडल्या
, शुक्रवार, 21 मार्च 2025 (14:25 IST)
सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या आणि सिगारेटचे पाकीट आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली आहे. एकीकडे विद्यापीठ अनुदान आयोग अमली पदार्थ विरोधी मोहिमा सुरु करण्याचे निर्देश देत आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर  प्रश्न उपस्थित केले जात आहे. या घटनेवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि दोषी विद्यार्थ्यांवर तसेच प्रकरण दाबणाऱ्या विद्यापीठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

एका विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली असून तिने तिच्या खोलीतील राहणाऱ्या काही विद्यार्थिनींनी तिला बळजबरी दारू पाजण्याचा प्रयत्न केला तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी चौकशी समिती या तक्रारीची सुनावणी करणार होती, त्याच दिवशी महिला वसतिगृहाच्या माजी प्रमुखांना काढून टाकण्यात आले. हा फक्त योगायोग होता की त्यात आणखी काही सत्य लपलेले आहे याचा तपास करणे आवश्यक आहे. तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीने विद्यापीठाच्या कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तिच्यावर रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छत्रपती संभाजीनगर : १४ वर्षांच्या मुलाचा जीबीएसमुळे मृत्यू, मृतांची संख्या २६ वर पोहोचली