Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उकाड्यापासून नागरिकांची लवकरच सुटका होणार

उकाड्यापासून नागरिकांची लवकरच सुटका होणार
, रविवार, 30 मे 2021 (11:27 IST)
येत्या 4 ते 5 दिवसात अरबी समुद्रातून येणारे वाष्प आणि राज्यावरून गेलेल्या कमी दाबपट्टीमुळे राज्यात पाऊस येण्याची शक्यता वर्तली जात आहे.हे वाष्प पश्चिमेकडून पूर्वीकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे जमा झाले आहे.त्यामुळे येत्या 4 दिवसात कोकण,मध्य महाराष्ट,मराठवाडा आणि विदर्भात पाऊस येण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.या पावसाने लवकरच उकाड्यापासून नागरिकांची सुटका होऊ शकते.  
 
राज्यात येत्या 2 जून पर्यंत मान्सून येण्याची दाट शक्यता आहे.शनिवारी मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आला. काल पुण्यात देखील जोरदार पाऊसाने आपली हजेरी लावली हा पाऊस रात्री पर्यंत सुरूच होता. शिवाजीनगर मध्ये 24 मिमी तर लोहगाव मध्ये 36 मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली.विदर्भ आणि कोकणात देखील पाऊस सुरु होता. 
 
सध्या राज्यावर कमी दाबाचे दोन पट्टे निर्माण झालेत. एक पूर्व उत्तर प्रदेशापासून विदर्भापर्यंत, तर दुसरा पट्टा हा पूर्व मध्य प्रदेशापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत आहे. हा दुसरा कमी दाबाचा पट्टा विदर्भ आणि तेलंगणामार्गे गेला आहे या मुळे अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेनं बाष्पही येत आहे .यामुळे राज्यात सध्या जोरदार वाऱ्यांसह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
 
हवामान विभागानुसार राज्यात 2 जून पर्यंत पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. मोसमी वारे केरळात दाखल होऊ शकते.हवामान विभागाने 1 जून ला केरळात मान्सून दाखल होण्याचे सांगितले होते.
 
महाराष्ट्रात कोकण,विदर्भ,मराठवाडा,या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच आज महाराष्ट्रातील काही भाग आणि जिल्ह्यात पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भात  पाऊस होण्याची शक्यता आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परभणीतील जवानाचे पठाणकोट मध्ये निधन