Publish Date: Tue, 15 Nov 2022 (18:18 IST)
Updated Date: Tue, 15 Nov 2022 (18:23 IST)
पुण्यात 'मुळशी पॅटर्न' चा थरार झाला असून पुण्यात बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी केल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. दोन गटातील हाणामारी केल्याची घटना बुधवार पेठेच्या क्रांती चौकात घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून अद्याप घटनेची नोंद पोलिसात झालेली नाही.
रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास ही घटना पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली असून सीसीटीव्ही फुटेज मध्ये दोन गट अमोरसमोर आले असून त्यांच्यात हाणामारी होत आहे. त्यात एका तरुणाच्या हातात कोयता असून तो काहींवर सपासप वार करत आहे. लोंकाची गर्दी दिसत असून घडलेल्या प्रकारामुळे लोकांचा गोंधळ उडाला आहे. आपला जीव वाचविण्यासाठी लोकांची पळापळ सुरु आहे. अद्याप या घटनेची नोंद पोलिसात झालेली नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उदभवला आहे. लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.