Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 10 April 2025
webdunia

पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान संपन्न

अमृत प्रोजेक्ट स्वच्छ जल
, सोमवार, 24 फेब्रुवारी 2025 (15:25 IST)
पुणे:-परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन आशीर्वादाने २३ फेब्रुवारी २०२५ची स्वर्णिम प्रभात एक नवीन जागृती व सेवेच्या दिव्य प्रकाशाचा संदेश घेऊन आली ज्यामध्ये ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याचे आयोजन विश्वभरात केले गेले.  
 
या अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा ४२ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. ज्यामध्ये ओंकारेश्वर नदी घाट, कात्रज तलाव,आळंदी-देहू-चऱ्होली येथील इंद्रायणी नदी घाट,मोरया गोसावी मंदिराचा पवना नदी घाट आदी प्रमुख जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली ज्यामध्ये हजारो निरंकारी सेवादल स्वयंसेवक व भाविक भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला अशी माहिती मिशनचे पुणे जिल्हा प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली. 
 
 संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाज कल्याण प्रभारी श्री.जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की देशभरात राबविलेल्या ‘अमृत प्रोजेक्ट’ परियोजनेच्या दरम्यान सर्व सुरक्षा नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आले. युवावर्गाचा विशेष सहभाग हा अभियानाचा मुख्य आधार होता. त्यांनी हेही सूचित केले, की ही मोहीम केवळ एका दिवसापुरती सीमित नाही तर दरमहा विविध घाट व जलस्रोतांची स्वच्छता निरंतर चालू राहील.  संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने, पूज्य बाबा हरदेवसिंहजी यांच्या असंख्य दिव्य शिकवणूकींतून प्रेरणा घेत या पावन अभियानाचे आयोजन करण्यात आले.
२७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील १६५० पेक्षा अधिक ठिकाणी १० लाखांहून अधिक संख्येने सेवाभावनेने ओतप्रोत स्वयंसेवक भक्तगणांनी संपूर्ण देशामध्ये एकाच वेळी हे महान अभियान साकारले. हे दृश्य केवळ प्राकृतिक स्वच्छतेपर्यंत सीमित न राहता, अंतर्मनाला निर्मळ आणि पवित्र करण्याऱ्या एका आध्यात्मिक यात्रेचे सुंदर प्रतीक बनले. प्रत्येक श्रद्धाळु भक्ताची समर्पित उपस्थिती या गोष्टीचे प्रमाण होते, की जेव्हा प्रेम, सेवा आणि समरसतेचा दिव्य संगम होतो तेव्हा प्रकृतीही नवजीवनाचा अनुभव घेते.
           
 सतगुरु माताजींनी पाण्याचे महत्व अधोरेखित करताना समजावले, की पाणी अमृतासमान आहे जे प्रकृतीने आपल्याला सर्वोत्तम उपहाराच्या रुपात प्रदान केले आहे. त्याची स्वच्छता आणि संरक्षण ही केवळ एक जबाबदारीच नव्हे तर आमची स्वाभाविक सवय बनून गेली पाहिजे. बऱ्याचदा आपण अजाणतेपणे आपण वापरा व फेकून द्या अशा वस्तू व घाण जलस्रोतांमध्ये टाकून प्रदूषणात भर घालत असतो ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते. याच चिंतनातून प्रेरित होऊन ‘प्रोजेक्ट अमृत’ सारख्या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे जी जल संरक्षण आणि स्वच्छतेच्या प्रति जागरुकता पसरविण्याचा एक महत्वपूर्ण प्रयास आहे.
            
बाबा हरदेवसिंहजी यांच्या जन्मदिवसाला समर्पित असलेल्या या पवित्र सेवा अभियानात प्रत्येक भक्ताला जल संरक्षणाच्या दिशेने योगदान देण्याची संधी मिळाली. हा पुढाकार केवळ घाट आणि जलस्रोतांच्या स्वच्छतेवर केंद्रीत नसून घरांमध्येही लहान-सहान सवयीतून जल बचतीला प्रोत्साहित करत आहे ज्यायोगे पाण्याचा आदर व्हावा आणि हे अमूल्य संसाधन भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित राहू शकेल.
पर्यावरण सुरक्षा अंतर्गत जल संरक्षणामध्ये आपली सकारात्मक सक्रिय भूमिका निभावत ग्लोबल एनर्जी ॲन्ड एन्व्हायरनमेंट फाउंडेशन (GEEF) ने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला (SNCF) प्रतिष्ठित ‘वाटर कंजर्वेशन इनिशिएटिव्ह एनजीओ ऑफ द ईयर २०२५’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. हा गौरवपूर्ण सन्मान SNCFच्या प्रोजेक्ट अमृत - स्वच्छ जल, स्वच्छ मन आणि त्यातील विविध जल संरक्षण व स्वच्छतेसाठी घेतलेल्या पुढाकाराच्या प्रति अथक समर्पणाचे प्रतीक आहे. नि:संशय जल संसाधनांची शुद्धता आणि सतत संरक्षण करण्यामध्ये SNCF द्वारे केले जाणारे प्रयास समाजाला स्वच्छ, स्वस्थ आणि समृद्ध भविष्याकडे अग्रेसर होण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तरुणाला अटक