Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात शहरातील CNG पंप बंद राहणार

पुण्यात शहरातील CNG पंप बंद राहणार
, बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (21:18 IST)
पुण्यात 1 ऑक्टोबर रोजी शहरातील CNG पंप बंद राहणार आहे. पुणे शहरात 60 पेक्षा जास्त सीएनजी पंप आहेत. मात्र, पंप बंद ठेवण्यात येणार असल्याने पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.  पुण्यात CNG वर मोठ्या प्रमाणात वाहने रिक्षा चालतात. दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार CNG च्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये वाढ व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार CNG च्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये वाढ व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
 
पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात वाहने सीएनजीवर चालणारी आहेत. त्यामुळे 1 ऑक्टोबरला पुणेकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महापालिकेने सीएनजीवरील पीएमपीएलच्या बसही आणलेल्या आहेत. त्यामुळे पीएमपीएल वाहतुकीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कांदा बाजारभावातील घसरण थांबविणेसाठी तातडीने प्रयत्न करा- छगन भुजबळ