Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे ३३.९ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडी निर्माण झाल्या

पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे ३३.९ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडी निर्माण  झाल्या
, मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (16:24 IST)
पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांमध्ये कोरोना रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे का  यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये शहरातील ते ३३.९ टक्के जणांना कोरोना होऊन गेल्याचा निष्कर्ष निघाला आहे. एकूण लोकसंख्येच्या सुमारे आठ लाख नागरिकांना कोरोना झाल्याचे आढळून आले आहे.
 
पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात अँटिबॉडी निर्माण झाल्याचे सर्वेक्षण निष्कर्ष सांगतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर च्या वतीने दिनांक ७ ते १७ ऑक्‍टोबर रोजी पाहणी करण्यात आली. यासाठी विविध २०० भाग निवडून दहा पथके तयार करण्यात आली होती. दहा दिवस सर्वेक्षण करून पाच हजार जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. 
 
निष्कर्ष एकूण २७ लाख लोकसंख्या लक्षात घेता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ३३.९ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडी निर्माण झाल्याचे आढळून आले आहेत. तसेच झोपडपट्टी भागातील नागरिकांमध्ये ३७.८ टक्के, झोपडपट्टी सदृश्य भागातील नागरिकांमध्ये ३८.३ टक्के, गृहनिर्माण सोसायटी भागातील नागरिकांमध्ये २७.७ टक्के अँटिबॉडी आढळून आल्या. तसेच ३६.८ टक्के महिलांमध्ये तर २८.९ टक्के पुरुषांमध्ये अँटीबॉडीज आढळून आले आहेत. पुरुषांपेक्षा महिलां मधील अँटीबॉडी अधीक विकसित अधिक असल्याचे दिसून आले आहेत. तसेच ५१ ते ६५ वर्षाच्या नागरिकांमध्ये हे अँटीबॉडीज अधिक आढळून आले आहेत. त्याचा दर ३५.५ इतका आहे तसेच किशोरवयीन बारा ते अठरा वर्षाच्या वयोगटामध्ये ३४.९ टक्के तर १९ ते ३३ या वयोगटांमध्ये २९.७, ३१ ते ५९ वयोगटांमध्ये ३१.२ आणि व ६६ वर्षावरील नागरिकांमध्ये २८.३ टक्के अँटीबॉडीज आढळून आलेले आहे. कोविडमुळे असणारा सर्वसामान्य मृत्यूदर ०.१८ असल्याचे असल्याचा निष्कर्ष संशोधनातून निघाला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाचा, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी आयएमए काय म्हणते