Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

कोरोनावरील कोव्हिशील्ड लस सुरक्षित, आगीत 5 जणांचा मृत्यू

Covishield vaccine safe on corona
, गुरूवार, 21 जानेवारी 2021 (18:46 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला लागलेली आग अटोक्यात आली आहे. सध्या अग्निशामन दलाकडून इथं कुलींगचं काम सुरू आहे. या आगीत शेवटच्या मजल्यावर अडकलेल्या 5 जणांच्या मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. मृतांमध्ये 4 पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. वेल्डिंगच्या स्पार्कमुळे ही आग लागली होती, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
 
सुदैवाने कोरोनावरील कोव्हिशील्ड लस सुरुक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ज्या इमारतीमध्ये कोव्हिशील्ड लस निर्मितीचे काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीचे काम सुरु आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला ही आग लागली आहे. 
 
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि हानी टाळणे याला सद्यस्थितीत प्राधान्य असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु सुरू आहेत. शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व संबंधित यंत्रणा आग विझविण्याचा आणि मदत कार्यात झाल्या आहेत. पुणे आयुक्तांकडून मी यासंदर्भातली माहिती घेतली असून दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुमारे १० लाख नोंदणीधारक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत सहभागी