यंदा दहीहंडी उत्सव अनुभवता येणार नाही कारण करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
करोना संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्धार गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट संचलित सुवर्णयुग तरुण मंडळाने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द केला आहे. दहीहंडी उत्सवासाठी राखून ठेवलेला एक लाख रुपयांचा निधी ट्रस्टतर्फे समाजोपयोगी उपक्रमात राबवण्यात येणार आहे.
तसेच शहरातील अनेक गणेश मंडळांकडून करोना संकटाची तीव्रता ध्यानात घेऊन यंदाच्या वर्षी दहीहंडी उत्सव रद्द करून त्या खर्च्यांत सेवा करण्याचे ठरविले आहे.
दहीहंडी उत्सव १२ ऑगस्ट रोजी असला तरी सार्वजनिक ठिकाणी गर्दीने जमा होण्यावर ३१ ऑगस्टपर्यंत निर्बंध असल्यामुळे यंदा दहीहंडी उत्सव होणार नाही.