ब्रेन डेड झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी अवयवदान करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे की मृत्यूनंतरही माणूस अमर होऊ शकतो. ब्रेन डेड महिलेला पुण्यातील लष्कराच्या दक्षिण कमांड रुग्णालयात (CHSC) आणण्यात आले. तिच्या जगण्याची आशा संपल्यावर तिच्या कुटुंबीयांनी तिचे अवयव किडनी, यकृत आणि डोळे दान केले. यामुळे पाच जणांच्या नवे जीवनदान मिळाले आहे. त्यापैकी दोन लष्करी जवान आहेत.
दक्षिण कमांडच्या संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, या मुलीला दुर्दैवी घटनेनंतर गंभीर अवस्थेत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. तिला रुग्णालयात आणले तेव्हा तिच्या मेंदूने काम करणे बंद केले होते. यावर त्यांच्या कुटुंबीयांनी निर्णय घेतला की तिचे अवयव अत्यंत गरज असलेल्या रुग्णांना दान केले जावे जेणे करून त्यांना जीवनदान मिळू शकेल.
अवयवदान प्रक्रियेसाठी आवश्यक परवानगी घेतल्यानंतर कमांड रुग्णालयातील प्रत्यारोपण पथक तातडीने कार्यरत झाले आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र आणि लष्कराच्या अवयव पुनर्प्राप्ती आणि प्रत्यारोपण प्राधिकरण यांना सूचित करण्यात आले. या तरुणीचे अवयव 14 आणि 15 जुलै 2022 पहाटे ला भारतीय लष्करात सेवा बजावणाऱ्या दोन जवानांच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले.
आर्मी मेडिकल कॉलेजच्या आय बँक सीएच (एससी) मध्ये डोळे सुरक्षितपणे जतन करण्यात आले आणि पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल असलेल्या रुग्णाला यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. मरणोत्तर अवयवदानाच्या या चांगल्या आणि परोपकारी अशा कृतीमुळे मृत्यूनंतर देखील या तरुणीने 5 जणांना जीवनदान दिले आहेत.