Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिंदे उद्यानाला आनंद दिघे यांचे नाव देण्याचा निर्णय

pune garden
, मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (15:11 IST)
पुण्यातल्या उद्यानाला माझं नाव कशाला दिलं, असे विचारत उद्यान वादावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी नगरसेवक नाना भानगिरे यांची कानउघडणी केली आहे. दरम्यान, आता शिंदे उद्यानाला आनंद दिघे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
पुण्यात हडपसर भागातल्या वादग्रस्त उद्यानाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव दिलं जाईल, अशी माहिती शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी दिली. संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच उद्यानाचे उदघाटन करणार होते. मात्र या उद्यानाच्या नावावरुन आणि प्रशासनाला माहिती नसण्यावरुन वाद पेटला होता. आता या उद्यानाला आनंद दिघे यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, असे ते म्हणाले.
 
याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाचे उद्घाटन करणार होते. मात्र हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हणून मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी