राज्यात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान मांडले होते. त्या पार्श्वभूमीवर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोरोनाआढावा बैठक घेतली.नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि पुण्यात नव्याने निर्बंध लावण्यात येणार का ?असे प्रश्नावर स्पष्टीकरण दिले.
सध्या लोक कोरोनाच्या नियमांचे पालन करत नाही.मास्क लावत नाही, कार्यक्रमात सहभागी होतात.सामाजिक अंतर राखले जात नाही.असं केल्यामुळे कोरोनाचे प्रकरण वाढले आहे.ज्या ठिकाणी समारंभ केले गेले ते संपूर्ण कुटुंबच कोरोना बाधित झाले.त्यामुळे असं काही ही करू नका ज्यामुळे कोरोनाची प्रकरणे वाढतील. पुणेकरांनी कोरोना प्रोटोकॉल चे पालन करा.नियमांना पाळा.पुण्यात नव्याने कोणतेही निर्बंध लावण्यात येणार नाही.पण सरकारला निर्बंध लावावा लागेल अशी वेळ येऊ देऊ नका.
निर्बंध लावल्यामुळे अनेकांचे रोजगार गेले,अनेको उद्योग अडचणीत आले आहे.महागाईचा फटका बसतच आहे.लोकांना काम नाही,काही घरात तर कमावतेच नाही,त्यामुळे आता पुन्हा सरकारला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका.
सध्या सणासुदीचे दिवस आहे.येत्या 10 तारखे पासून गणेशोत्सव सुरु होत आहे.सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला बघता आपल्या भावनांवर आवर घालून सण साजरे करा.मोठ्या गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांनी जे काही निर्णय घेतले आहेत त्यांचे पालन करा.गणेशोत्सव साध्या प्रमाणात साजरा करा.असं काहीही करू नका ज्यामुळे सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील.