Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉ. प्रदीप कुरुलकर ईमेलद्वारे पाकिस्तानच्या संपर्कात,डॉ. कुरूलकर यांना अटक

arrest
, मंगळवार, 9 मे 2023 (21:43 IST)
डॉ. कुरुलकर यांच्या सोशल मीडियातून फोटो, व्हिडिओ आणि फाईल्स् शेअर झाल्या आहेत. त्यांच्या मोबाईल आणि अन्य डिव्हाइसमधून डिलिट झालेला डेटा फॉरेन्सिक लॅबकडून पुन्हा प्राप्त झाला आहे. या डेटाचा तपशील घेण्याचे काम सुरु आहे. परदेश दौऱ्यावर असताना डॉ. कुरुलकर सहा देशात गेले होते. या दौऱ्यांची सर्व माहिती डॉ. कुरुलकर यांच्याकडून घ्यायची आहे. डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये डॉ. कुरुलकर यांना भेटायला आलेल्या महिला कोण होत्या, याचा तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांच्या कोठडीत वाढ करावी, अशी मागणी एटीएसने पुणे विशेष न्यायालयात केली. ती मागणी न्यायालयाने मान्य केली.
 
DRDO या संस्थेत काम करणारे डॉ. प्रदीप कुरूलकर हे नकळतपणे हनी ट्रॅप प्रकरणात अडकले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांची छायाचित्रे वापरून या अधिकाऱ्याला पाकिस्तानने आपल्या जाळ्यात ओढले. यानंतर तो पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला. ते गेल्या सहा महिन्यांपासून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
 
ते पाकिस्तान गुप्तचर संस्थेतील एका महिलेच्या संपर्कात देखील होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप कॉलिंग आणि व्हॉट्सअपच्या व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना माहिती पुरवली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून डीआरडीओच्या दक्षता विभागाकडून आणि गुप्तचर पथकांकडून डॉ. कुरूलकर यांच्यावर नजर ठेवून होते. अखेरीस याबाबतची संपूर्ण माहिती पुराव्यानिशी मिळाल्यानंतर आणि DRDO मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर ATSने अधिकृत गुप्त कायद्यांतर्गत आरोपी डॉ. कुरूलकर यांना अटक केली.

Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘केरला स्टोरी’च्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली पाहीजे : जितेंद्र आव्हाड