Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात इतक्या वाहनचालकांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई

पुण्यात इतक्या वाहनचालकांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई
, सोमवार, 27 मे 2024 (09:03 IST)
पुणे पोर्श कार अपघात प्रकारणांनंतर वाहतूक पोलिसांनी ड्रंक आणि ड्राइव्हची  कारवाई वाढवली असून शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 117 मद्यपींवर वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.तीन दिवसांपूर्वी 85 जणांवर कारवाई केली होती. 
 
वाहतूक पोलिसांनी येरवडा, मुंढवा, कोरेगाव, विमाननगर, कोरेगाव पार्क भागात नाकेबंदी करून 117 मद्यपींवर वाहन चालकांवर कारवाई केली. मध्यरात्री नंतर शहरात होणारे वाहन अपघात रोखण्यासाठी नाकेबंदी करून मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे. वेगवेगळ्या भागात कारवाई करत वाहतूक पोलिसांनी 1409 वाहन चालकांची तपासणी करत 117 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. 

वाहतूक पोलिसांनी येरवडा, सहकारी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 जणांवर कारवाई केली आहे. तसेच 262 कारवाया करून 2 लाख 84 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आले. 
ही नाकेबंदी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे वाहतूक विभागाने सांगितले.   
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अकोल्यात कलम 144 लागू , कारण जाणून घ्या