त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनांचा बहिष्कार म्हणून सध्या राज्यात अमरावती मालेगाव आणि नांदेड मध्ये वातावरण तापले आहे. इथे हिंसाचार सुरु आहे. या घटनेच्या पार्श्ववभूमीवर पुण्यातील काही ग्रामीण भागात कलम 144 लावून प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्यात आले आहे. दिनांक 14 नोव्हेंबर पासून 20 नोव्हेंबर पर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहे.
त्रिपुरात झालेल्या घटनेचा फायदा घेऊन काही समाजकंटक सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण होतील अशा बातम्या पसरवतात आहे. त्यामुळे काही निर्बंध पुणे ग्रामीण भागात लावण्यात आले आहे. हे निर्बंध आजपासून सात दिवस असणार.
या अंतर्गत काही गोष्टींवर आळा घालण्यात आला आहे.
* सोशल मीडियावर एकाद्या ग्रुपच्या सदस्याने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यास संपूर्ण जबाबदारी अडमिनची असणार.
* सोशल मीडियावरून जातीय तणाव निर्माण करणारी पोस्ट टाकू नये.
* समाज माध्यमांवर अफवा किंवा चुकीची माहिती पसरवणे गुन्हा असेल.
* जातीय तणाव निर्माण करणाऱ्या घोषणा देणे किंवा बॅनर लावू नये.
* कलम 144 मध्ये पाच किंवा या पेक्षा अधिक लोकांनी जमावडा करू नये.
* जवळ शस्त्र, काठ्या, हत्यार बाळगू नये.
जमावबंदीचे कायदे मोडल्यास किंवा आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ही आदेशात सांगण्यात आले आहे.