भाजपचे माजी नगरसेवक आणि भोसरीतून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक रवी लांडगे यांनी आज ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. त्यांच्या सोबत शेकडो समर्थक देखील होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून स्वागत केले. या वेळी अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर, आमदार मिलिंद नार्वेकर आणि पिंपरी चिंचवडचे शिवसेनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
लांडगे यांनी पिंपरी -चिंचवड ते मुंबई पर्यंत शक्तिप्रर्दशन केले. जोरदार बॅनर बाजी केली. लांडगे यांनी शिवबंधन स्वीकारून पक्षाकडून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपडे निभावण्याचे सांगितले. रवी लांडगे हे 2017 मधील महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले
रवी लांडगे यांना भाजपची सत्ता आल्यानंतर पदावरून डावलण्यात आले असून त्यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपचा राजीनामा दिला. काही बदल होतील याची वाट बघून आता त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्व ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला असून नेहमी अन्याय आणि गरिबांच्या हक्कासाठी लढला आहे. शिवसेनापक्ष एक विचारधारा मानणारा पक्ष आहे. त्यापक्षाचे कार्यकर्त्ये त्यासाठी एकनिष्ठ आणि समर्पित आहे. हा पक्ष आमच्यासाठी योग्य असल्यामुळे आम्ही या पक्षात प्रवेश करत आहो.