Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 25 April 2025
webdunia

Pune Crime पुण्यात माजी नगरसेविकेवर अत्याचार; गुन्हा दाखल

crime
, गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (14:00 IST)
Pune Crime पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 
 
पीडित नगरसेविका महिलेने या प्रकरणी पर्वती पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी सचिन मच्छिंद्र काकडे (वय 43, रा. संतोषनगर, कात्रज) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
मैत्रीपूर्ण संबंधाची पतीला माहिती देण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचे आरोपात मांडले आहे. नगरसेविकेला 2017 पासून धमकावून काकडेने अत्याचार केल्याचे सांगितले गेले. नगरसेविकेला धमकावून वेळोवेळी दहा लाख रुपये उकळले असल्याची माहिती समोर आली आहे.
 
आरोपी सचिन काकडेने तिच्या घरी येऊन तिला मारहाण केल्याचेही पोलिसांत तक्रार दाखल केलेल्या फिर्यादीत महिलेने म्हटले आहे.
 
पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत. एका माजी नगरसेविका महिलेवरील बलात्काराच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीबाबत फडणवीस यांच्या आरोपांचे शरद पवार यांनी खंडन केले