पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगर सेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी मध्यरात्री गोळीबार झाला. या अपघात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना हे गॅंगवार असल्याचा प्राथमिक संशय होता. मात्र या प्रकरणाचा तपास केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली आहे. वनराज यांची हत्या त्यांच्या सख्ख्या बहिणींनी आणि मेहुण्यांनी केल्याचं समोर आलं आहे.
वनराज आंदेकरांच्या हत्या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. वनराज यांची कौटुंबिक वादातून आणि पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली.
वनराज रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास रस्त्यावर निवांत गप्पा करत असताना 10 ते 15 जण आले आणि सिने स्टाईल हल्ला केला. या पैकी 5 जणांकडे बंदूक होती त्यातून त्यांनी गोळ्या झाडल्या. आणि बाकी लोकांनी आपल्या कडे कोयता लपवून ठेवला होता. वनराज यांच्यावर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार केले.
या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पुण्याचे सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.