महाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे संशयास्पद मृत्यूंची संख्या 4 वर पोहोचली आहे, तर राज्यात आतापर्यंत नोंदलेल्या रुग्णांची संख्या 140 वर आहे. राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात गुरूवारी एका 36 वर्षीय व्यक्तीचा न्यूमोनियामुळे श्वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाला.
सिंहगड रोडच्या धायरी भागातील चौथा संशयित पीडित 60 वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी मृत्यू झाला. या व्यक्तीला 27 जानेवारी रोजी अतिसार आणि खालच्या अंगात अशक्तपणा आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'एकूण 26 रुग्ण पुणे शहरातील आहेत. पीएमसी क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील 78 रुग्ण आहेत. 15 पिंपरी चिंचवड, 10 पुणे ग्रामीण आणि 11 इतर जिल्ह्यातील आहेत. शुक्रवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही. राज्यात सर्वाधिक प्रकरणे पुणे आणि परिसरातील आहेत.
पुणे शहरातील विविध भागातील एकूण 160 पाण्याचे नमुने रासायनिक व जैविक विश्लेषणासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. 'गुलियन-बॅरे सिंड्रोम' हा प्रदूषित पाणी पिण्यामुळे होतो. पुण्यातील आठ जलस्रोतांचे नमुने दूषित आढळले. सिंहगड रोड परिसरातील एका खाजगी बोअरवेलमधून मिळालेल्या नमुन्यांपैकी एका नमुन्यात एस्चेरिचिया कोलाय किंवा ई. कोलाय बॅक्टेरिया आढळून आला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.