गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस राहिले आहे. बाप्पाच्या आगमनासाठी सार्वजनिक मंडळ तसेच घरोघरी जय्यत तयारी सुरु आहे. गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनची तयारी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात पूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व दारूच्या दुकानी बंद राहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. विशेष पथकांमार्फत अचानक तपासणी केली जाणार आहे. मद्यनिषेध अधिनियम १९४९ मधील नियम १४२ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत.दिले असून गणेशोत्सवाच्या काळात 31 ऑगस्ट बाप्पाच्या आगमनापासून ते 10सप्टेंबर पर्यंत महापालिकाक्षेत्रातील दारूच्या सर्व दुकानी बंद राहतील. तसेच घरगुती गणपती विसर्जन च्या 5व्या आणि 7व्या दिवशी देखील देखील संबंधित दारूच्या दुकानी बंद राहतील.