Photo: Social Media
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणाच्या व्यवहारात सहभागी असलेल्या गोखले बिल्डर्सने माघार घेतली आहे. तसेच कंपनीचे प्रमुख विशाल गोखले यांनी ट्रस्टला ईमेल करून व्यवहार रद्द करण्याची माहिती दिली असून व्यवहारातील 230 कोटी रुपये परत मिळावे अशी मागणी केली आहे.
करारातील अटीनुसार, व्यवहार रद्द केल्यास पैसे परत करण्याची कोणतीही सक्ती नसणार. त्यामुळे आता गोखले बिल्डर्सचे कोटी रुपये अडकण्याची शक्यता आहे.
आता या प्रकरणाची सुनावणी धर्मादाय आयुक्तांकडे होणार असून पुढील निर्णय आयुक्तांच्या आदेशावरच अवलंबवून आहे.
या प्रकरणात जैनमुनींनी पत्रकार परिषद घेत या विषयाला कोणतेही राजकीय रंग न देण्याचे म्हटले आहे. हा प्रश्न गरिबांच्या भविष्याशी निगडित असल्याचे म्हणाले.
पंतप्रधान मोदींना सकल समाजाच्या वतीने 29 ऑक्टोबर रोजी एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार असून निवेदन देणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Edited By - Priya Dixit