Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलिस आयुक्तांना थेट त्याच्या प्रेमातील अडचण सांगितली, पोलिस आयुक्तांचे अफलातून उत्तर, म्हणाले…

पोलिस आयुक्तांना थेट त्याच्या प्रेमातील अडचण सांगितली, पोलिस आयुक्तांचे अफलातून उत्तर, म्हणाले…
, मंगळवार, 9 मार्च 2021 (09:33 IST)
पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरवरून पुणेकरांशी संवाद साधला. यावेळी वाहतूक, मास्क, पोलिसांची वागणूक, महिला सुरक्षा, नियम आदीबाबत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाची गुप्ता यांनी दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी अनेकांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातीलही प्रश्न विचारले. पण त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सामान्य माणसासारखी उत्तरे दिली. एका तरुणाने पुणे पोलिस आयुक्तांना थेट त्याच्या प्रेमातील अडचण सांगत त्यातून काहीतरी मार्ग काढून द्या असे सुचवले. आयुक्तांनी पण त्याला आपल्या खास शैलीत उत्तर देत आधारही दिला आणि मार्गदर्शन केले.
 
सर..मला आवडणारी मुलगी बालाजीनगरला राहायला आली आहे. मी तिला प्रपोजही केले. परंतु, ते नाकारून तिने आपण फक्त मित्रच आहोत असे सांगितले. प्लिज सर..तुम्ही काहीतरी करून द्या, असा प्रश्न थेट पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना ट्विटरवर विचारला होता. त्या तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त गुप्ता म्हणाले की, त्या मुलीची इच्छा नसेल तर तू काहीच करू नकोस. आम्हीही काही करणार नाही. पण आमच्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबतच आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात आणखी २० सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रांची पडली भर