Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

पुण्यात म्युकरमायकोसीसचे 574 रुग्ण, 25 रुग्णांचा मृत्यू

In Pune
, मंगळवार, 25 मे 2021 (08:11 IST)
पुण्यात म्युकरमायकोसीसची (काळी बुरशी) एकूण 574 रुग्णांना लागण झाली आहे. त्यापैकी 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
 
देशात कोरोना संसर्गाची परिस्थिती चिंताजनक असताना म्युकरमायकोसीसचा (काळी बुरशी) आजाराचा धोका वाढतो आहे. देशात आठ हजारांहून अधिक म्युकरमायकोसीसचे रुग्ण आहेत. त्यापैकी महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक व हरियाणा या राज्यांत सर्वाधिक रुग्ण आहेत.
 
महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे दोन हजारांहून अधिक रुग्ण आहेत. या रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक अम्फोटेरेसिन-बी या औषधाचा पुरवठा केंद्राने वाढवला आहे.  केंद्राने 19 हजार 420 व्हायल्स विविध राज्यांना पुरवले आहेत. त्यापैकी महाराष्ट्राला 4 हजार 60 व्हायल्स दिल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सचिन वाझे, रियाज काझी पाठोपाठ विनायक शिंदे पोलीस दलातून बडतर्फ