शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पुण्यातील एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीला टेरेसवर नेऊन तिच्यावर बलात्कारकरुन (अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 52 वर्षाच्या नराधम शिक्षकाला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.
हा धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune Crime) वानवडी परिसरात घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.संजय रमेश शर्मा Sanjay Ramesh Sharma (वय-52 रा. जगताप नगर, वानवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.याप्रकरणी पीडित मुलीच्या (वय-15) आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 3 ऑगस्ट आणि 29 ऑक्टोबर दरम्यान आरोपीच्या राहत्या घराच्या टेरेसवर घडला.
पीडित मुलीला धमकावून त्याने हे कृत्य केले. पीडित मुलीने तिच्या आईला आरोपीने केलेल्या घाणेरड्या कृत्याबद्दल सांगितल्यावर आईने वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.वानवडी पोलिसांकडे तक्रार (Pune Crime) दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी सांगितले.