Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 2 March 2025
webdunia

पुण्यात सावकराच्या त्रासाला कंटाळून कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, आई-मुलाचा मृत्यू

suicide
, रविवार, 19 जानेवारी 2025 (14:40 IST)
व्याज देऊन आणि जमिनीची नोंद करूनही सावकारांनी आणखी पैशांची मागणी केल्याने कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.या घटनेत आई अणि मुलाचा मृत्यु झाला तर पति ने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शुभांगी वैभव हांडे(36), धनराज वैभव हांडे(9) अशी मृतांची नावे आहे. 

सदर घटना सोनावणे वस्ती, चिखली येथे घडली आहे.वैभव मधुकर हांडे (वय 50, रा. सोनवणे वस्ती, चिखली) हे  बचावले. याप्रकरणी त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष पांडुरंग कदम (वय 48, रा. ताथवडे), संतोष दत्तात्रेय पवार (वय 49, रा. कुदळवाडी, चिखली) आणि जावेद मेहबूब शेख (वय 36, रा. मोई, खेड) यांना अटक करण्यात आली आहे.
हांडे यांनी त्यांच्या व्यवसायासाठी कदम यांच्याकडून 6 लाख रुपये आणि पवार यांच्याकडून 2 लाख रुपये प्रति महिना 10 टक्के व्याजाने घेतले होते. शेख यांच्याकडून व्याजावर चार लाख रुपये उसने घेतले होते. हांडे यांनी कदम यांना 9 लाख 50 हजार रुपये दिले. एक एकर जमीनही त्यांनी लिहून घेतली होती. दरमहा 20 हजार रुपये व्याज देऊन त्यांनी 20 गुंठे जमीन पवार यांना दिली होती. यानंतरही पवार यांनी 14लाख रुपये देईपर्यंत जमीन परत करणार नसल्याचे सांगितले. शेख यांनी कर्जाचे व्याज म्हणून 4 लाख 50 हजार रुपयेही दिले.

यानंतरही आरोपींनी हांडे यांच्यावर व्याजाची रक्कम देण्यासाठी दबाव टाकला. हांडे यांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. सावकारांच्या या छळाला कंटाळून त्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.वैभव यांनी पत्नी आणि मुलाला झोपेच्या गोळ्या दिल्या त्यामुळे त्यांचा मृत्यु झाला नंतर वैभव यांनी अपार्टमेंटमधील पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
 
पोलिसांनी पुढे सांगितले की, त्या व्यक्तीने आपल्या 14 वर्षांच्या मुलाला, जो मुंबईत एका नातेवाईकाकडे राहत होता, त्याला आत्महत्येबद्दल सांगणारा मेसेज केला होता. या मेसेजनंतर मुलाने शेजाऱ्यांना त्याच्या कुटुंबाची माहिती घेण्यास सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, या व्यक्तीने दोन सावकारांकडून 6 लाख आणि 2 लाख रुपये मासिक 10 टक्के व्याजदराने घेतले होते. नंतर त्याने दुसऱ्या सावकाराकडून जास्त व्याजदराने 4 लाख रुपये घेतले. मूळ रक्कम आणि अतिरिक्त नऊ लाख रुपये परत करूनही सावकारांनी अधिक पैसे देण्यासाठी त्याचा छळ सुरूच ठेवला. या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाउल घेतले. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर शिवशाही बसने पेट घेतला