Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात पुन्हा एका सराईत गुन्हेगाराचा खून

murder
, रविवार, 14 जानेवारी 2024 (12:42 IST)
पुण्यातील गुंड शरद मोहोळच्या खुनानंतर आता पुन्हा पुण्यातील कॅम्प भागात एका सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या गुन्हेगारांचे नाव अरबाज उर्फ बबन इकबाल शेख असे आहे. त्याच्यावर 25 गुन्हे दाखल होते. तो दोनवेळा तडीपार होता तर त्याच्यावर तीन वेळा महाराष्ट्र झोपडपट्टी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली होती. तो तुरुंगातून अलीकडेच बाहेर आला होता. शनिवारी पहाटे चार अज्ञात हल्लेखोरांनी  त्याच्या डोक्यात वार करून खून केला.चार पैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.  

शनिवारी कॅम्प भागातील ठाण्यात एकाचा कॉल आला त्याने पोलिसांना एका भांडण्यातून एकावर वार झाल्याचे सांगितले असून तो व्यक्ती जखमी अवस्थेत पडला आहे असे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर त्याच्या डोक्यात दगड घातलेले किंवा एकाद्या अवजड वस्तूने वार केल्याचे दिसले. पोलिसांनी तातडीनं रुग्णवाहिका बोलावली असता तो मयत असल्याचे आढळले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून एका ला ताब्यात घेतले आहे.मृत शेखवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून दोन वेळा तडीपार करण्यात आले होते. शेख वर एकूण 25 गुन्हांची नोंद होती. नागरिकांमध्ये त्याची दहशत होती. 
 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pandharpur : तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू