रस्ते अपघातात अनेकांचा अपघाती मृत्यू होण्याचा घटनांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकदा हेल्मेटची सक्ती करून देखील लोक हेल्मेटचा वापर करत नाही. वेगाने धावणारे वाहन अपघातग्रस्त होतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पुण्यात आरटीओ ने जिल्ह्यातील सर्व कंपन्यांना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्याचा नोटीसा देण्यात आल्या आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील एकूण 1744 कंपन्यांना नोटीसा दिल्या आहेत. कंपन्यानी सीसीटीव्ही फुटेजसह हेल्मेटशिवाय कंपनी परिसरात प्रवेश करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी सादर करण्यास सांगितले आहे.
सध्या पुण्यात आणि पुणे जिल्ह्यात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट वापरा बाबत व्यापक जनजागृती आणि अमलबजावणी मोहीम राबवली जात आहे. हेल्मेट सक्ती करण्याची शक्यता पुण्यात लवकर होण्याचे वृत्त मिळत आहे. मात्र हे कधी होणार अद्याप या बाबत माहिती नाही.
हेल्मेट नसल्यामुळे दुचाकी स्वारांना अपघातात जीव गमवावा लागतो. ते रोखण्यासाठी कंपन्यांना नोटिसा देण्यात आले आहे. जेणे करून नागरिक हेल्मेटचा वापर करतील.