महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवाजीनगर जिल्हा न्यायालय-स्वारगेट भूमिगत मेट्रो विभागाचे उद्घाटन करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचे उदघाटन रविवारी करणार आहे.
उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे अनेक नेते पुण्यात उपस्थित राहण्याची शक्यता भारतीय जनता पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. स्वारगेट-कात्रज मेट्रो लाईन आणि भिडे वाड्याची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत, जिथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. सोलापूर विमानतळाचे उदघाटन देखील पंतप्रधान ऑनलाईन करणार आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले की, पुण्यातील खराब हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन उद्घाटनाला उशीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्थगितीमुळे प्रवाशांची आणि नागरिकांची निराशा झाली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पंतप्रधानांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन केल्याशिवाय मेट्रो सेवा का सुरू होऊ शकत नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे,