येत्या 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी निमित्त वारकरी मोठ्या प्रमाणात आळंदीत येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील असलेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे कारखान्यातील रासायनिक सांडपाणी , थेट इंद्रायणीत सोडले जात असल्यामुळे इंद्रायणीचं पाणी पुन्हा फेसाळलं आहे.
हे पाहून आळंदीच्या रहिवाश्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. इंद्रायणीला हिम नदीचे रूप आले असून पांढऱ्या फेसाचे ढीग पाण्यावर तरंगत होते.
नागरिकांनी पाहत प्रदूषण नियंत्रण मंडळ, आळंदी नगर परिषद, पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून कार्तिकी यात्रापूर्वी नदी प्रदूषण रोखण्यास उपाय योजना करण्याची मागणी केली आहे.