Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 March 2025
webdunia

पुणे नगररचना विभागातून निलंबित केलेल्या सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकरला अटक

पुणे नगररचना विभागातून निलंबित केलेल्या सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकरला अटक
, बुधवार, 24 मार्च 2021 (07:45 IST)
बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नगररचना विभागातून निलंबित केलेले सह संचालकास हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय 55, रा. स्वप्नशिल्प सोसायटी कोथरूड) यांना अटक केली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 417, 467, 468 नुसार गुन्हा दाखल आहे. दरम्यान यापूर्वी देखील हनुमंत नाझीरकर यांच्यावर पुण्यातील दत्तवाडी, आलंकार आणि नवी मुंबई पोलिसांकडे गुन्हे दाखल आहेत.
 
बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाझीरकर हे पसार झाले होते. गेल्या एक महिन्यापासून गुंगारा देत होते. त्यामुळे त्यांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात होता. यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला नाझीरकर हे महाबळेश्वर परिसरात असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने त्यांना अटक केली आहे. त्यांना पुढील तपासासाठी बारामती पोलिसांकडे देण्यात आले आहे. दरम्यान अटकेसाठी सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणांचे सीसीटीव्ही तपासले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हयगय नको, 'या' कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा