rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेसीबी खरेदी व्यवहारात लता व शशांक हगवणे यांनी केली आर्थिक फसवणूक

JCB Purchase Transaction Fraud
, शुक्रवार, 30 मे 2025 (11:11 IST)
निगोजे येथील रहिवासी प्रशांत येळवंडे यांच्याशी झालेल्या जेसीबी खरेदी व्यवहारात लता व शशांक हगवणे यांनी आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पैसे परत मागितल्यावर पिस्तूल दाखवून धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रशांत येळवंडे यांनी मार्च 2022 मध्ये लता व शशांक हगवणे यांच्याकडून 24 लाख रुपयांचा जेसीबी विकत घेण्याचा व्यवहार केला होता. व्यवहाराच्या वेळी त्यांनी पाच लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला होता. 
या मशिनवर बँकेचे 19 लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती मिळाली आहे. 
ALSO READ: पुणे पोलिसांनी लष्कराच्या गणवेशात फिरणाऱ्या तोतया सैनिकाला पकडले
त्यानुसार, दर महिन्याला 50 हजार रुपयांचे हफ्ते भरावे असे ठरले असून एकूण 6.70 लाख रुपये लता हगवणे यांच्या खात्यात जमा करण्यात आले.
ALSO READ: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात माजी मंत्र्याच्या मुलासह पाच जणांना अटक
मात्र त्यांनी हे पैसे बँकेकडे हफ्ते भरण्यासाठी वापरले नसून तर ते पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. 
हप्ते न भरल्यामुळे बँकेने ऑगस्ट 2024मध्ये सदर जेसीबी जप्त केली. त्यानंतर हगवणे यांनी ती जेसीबी बँकेकडून सोडवून घेतली पण ती पुन्हा येळवंडे यांच्याकडे सुपूर्द केली नाही. याबाबत आता गुन्हा दाखल होणार असून यामुळे हगवणे कुटुंबियांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बनावट नकाशा प्रकरणी कडक कारवाई करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश