Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नववर्षापूर्वी पुण्यात मोठी कारवाई, एक कोटी रुपयांची दारू जप्त, नऊ जणांना अटक

drink
, सोमवार, 30 डिसेंबर 2024 (21:35 IST)
Pune News : नववर्षापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुण्यात बनावट दारूविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. विभागाच्या पथकाने ठिकठिकाणी कारवाई करून एक कोटींहून अधिक किमतीची दारू जप्त केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुण्यात बनावट दारूविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. या कारवाईत एकूण 1 कोटी 20 लाख 32 हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय विदेशी दारूच्या 1668 बाटल्या आणि 5 वाहनेही जप्त करण्यात आली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाला संशयास्पद वाहनांची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या दारूचे 3 बॉक्स आढळून आले. नसरापूर येथील शेडवर छापा टाकण्यात आला. तेथे वीटभट्ट्यांसाठी लागणारी कोळसा पावडर व गोवा बनावटीचे विविध ब्रँडचे विदेशी दारूचे बॉक्स ट्रकमध्ये तर पत्रा शेडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे थर्माकोलचे बॉक्स आढळून आले.

Edited By- Dhanashri Naik 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नितीश राणेंवर जोरदार टीका केली