मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटील आज पुण्याच्या दौऱ्यावर असून पुण्याच्या राजगुरूनगर येथे आज त्यांची सभा होणार आहे. पुण्याच्या दौऱ्यावर असतांना ते पुणे जिल्ह्यातील काही गावांना देखील भेट देणार आहे. मराठा क्रांती मोर्चा कडून सुमारे 5 लाख बांधव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य रकरला 24 ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज राज्यात दौरे करत असून आज राजगुरूनगर येथे त्यांची सभा होणार असून या सभेसाठी 100 एकर जागेची निश्चिती केली आहे. ऑक्टोबर उकाड्यामुळे सभेत कोणालाही त्रास होऊ नये या नाही तशी उपाय योजना सभास्थळी करण्यात आली आहे. या सभेला 5 लाख मराठा बांधव येण्याचा अंदाज आहे. या सभेत काय होणार या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.