पुण्यातील एका सोफाच्या कारखान्यात भीषण आग लागली असून या आगीत एक कर्मचारी जिवंत होरपळला आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. मात्र एका कर्मचाऱ्याला वाचवता आले नाही. त्याला उपचारासाठी नेले असता त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.
सदर घटना पुण्यातील येवलेवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी घडली असून अग्निशमदलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. आगीत 45 वर्षाच्या व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला.
वेल्डिंगचे काम सुरु असताना छोट्या सिलिंडरच्या स्फोटाने ही आग लागल्याचे स्थानिकांनी सांगितले. आगीमुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे.स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत.