Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे हादरले! चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

rape
, गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (08:52 IST)
पुणे : येथील चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १५ वर्षे वयाच्या मुलीसोबत सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या नराधमांनी चाकूचा धाक दाखवत मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुलीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. इतक्यावर हे नराधम थांबले नाहीत, तर बलात्कार केल्यानंतर त्या नराधमांनी तिचे आक्षेपार्ह फोटो काढून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी त्यांनी पीडितेला दिली होती.
 
जय राजू तिंबोळे, ओम राजू तिंबोळे, किरण जावळे, शुभम जाधव, सुनील जाधव आणि अनिल जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जुलै ते डिसेंबर २०२२ या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला होता. आरोपी अनिल जाधव यांनी पीडित मुलीचे अपहरण केले. त्यानंतर एका लॉजवर तिला घेऊन जात तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
 
तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन इतर आरोपींनी वेळोवेळी तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर मात्र पीडितने आपल्या आईला सगळा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडितेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. दरम्यान या बलात्कारामुळे पुणे शहर मात्र हादरले आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रवादीला जेरीस आणण्यासाठी देशमुख,मलिकांना अटक-जयंत पाटील