Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा स्वबळाचा नारा

पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा स्वबळाचा नारा
, सोमवार, 14 जून 2021 (07:57 IST)
पुण्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताना पाहायला मिळत आहे. 2022 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. मात्र, आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेकडून जागाचं गणित मांडण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिकेवर स्वबळावर झेंडा फडकवण्याचा निर्धार केलाय, तर भाजपनं खासदार गिरीश बापटांवर जबाबदारी सोपवल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंदेखील स्वबळाचा नारा दिला आहे. 
 
पुण्यात राज ठाकरे यांच्या भित्तीचित्राचं उद्घाटन करण्यात आलं. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या हस्ते 53 फुट उंचीच्या भित्तीचित्राचं उद्घाटन पार पडलं. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी मनसेनं पुणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुकलं आहे. मनसेनं यावेळी स्वबळावर पुणे महापालिका निवडणुकीत उतरणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बघता बघता जमिनीत कार अडकली