Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात बाळाला प्रियकरासोबत आईनेच शौचालयाच्या भांड्यात कोंबलं

mother threw the newborn baby in the toilet bowl in pune
, गुरूवार, 26 मे 2022 (14:20 IST)
पुणे- अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात बाळाला जन्म देणाऱ्या आईने प्रियकराच्या मदतीने सार्वजनिक शौचालयाच्या भांड्यात कोंबल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगर येथे बुधवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळ गाठून स्थानिक लोकांच्या मदतीने मुलाला शौचालयातून बाहेर काढले.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाईनगर वडगाव येथील समाज मंदिर, सार्वजनिक महिला स्वच्छतागृहाच्या पाठीमागे एका महिलेने नवजात अर्भकाला जन्म दिला आणि ते टॉयलेट भांड्यामध्ये कोंबून ठेवले आहे. असा कंट्रोलमधून सकाळी आठच्या सुमारास फोन आला. माहिती मिळताच ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार माळी व कट्टे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बाळाला भांड्यातून बाहेर काढले. 
 
पोलिसांनी पाहणी करताच त्यांना महिला शौचालयात असलेल्या भांड्यात हे नवजात अर्भक कोंबलेले रडत असलेले आढळून आले. हे बाळ अर्धे भांड्यात तर अर्धे लाईनमध्ये अडकले असल्यामुळे त्याला बाहेर काढणे कठीण झाले होते. त्यातच रक्तस्त्राव होत असल्यामुळे हाताला तेल लावून चिमुकल्याला भांड्यातून बाहेर काढले आणि पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले गेले.
 
या निर्दयी प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. तर या निर्दयी व नराधम असलेल्या महिलेस व प्रियकरास ताबडतोड अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोड बातमी; आता साखर होणार स्वस्त, केंद्र सरकारचा निर्णय