पुणे : कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान करताना आम्हा कुटुंबीयांना मुक्ताची उणीव भासत आहे. त्या असत्या तर पोटनिवडणूक लागलीच नसती, त्यांच्या नसण्याने आम्हाला खूप दु:ख होत आहे, अशी भावूक प्रतिक्रिया मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी रविवारी दिली.
शैलेश टिळक यांनी कुटुंबियांसह सकाळी साडेअकराच्या सुमारास कन्या शाळा येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी ते मीडियाशी बोलत होते. ते म्हणाले, या निवडणुकीत भाजप मोठय़ा मताधिक्याने निवडून येणार आहे. सर्व मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा. आम्हीही टिळक कुटुंबियांनी मतदान केले. मतदानावेळी मुक्ताची उणीव भासली. ती असती तर ही पोटनिवडणूक लागलीच नसती. तिच्या नसण्याने मोठे दु:ख होत आहे.
सत्ताबदलानंतर ही होणारी पहिली पोटनिवडणूक होती. काही दिवसांवर महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची असल्याचे टिळक म्हणाले.
Edited By- Ratnadeep Ranshoor