पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलच्या मालकाने मटणाची उधारी न देत मटण विक्रतेची फसवणूक केल्याचा प्रकार घडकीस आला आहे. ही फसवणूक 500 रुपये किंवा 100 रुपयाची नाही, तर तब्बल 61 लाखांची उधारी आहे. हॉटेलमध्ये मटणाचे चाप, मटण, खिमा आणि चाप यासारखे प्रकार विकत घेतले. पण मटण विक्रेत्याला पैसे दिले नाही. या प्रकरणी मटण विक्रेत्याने हॉटेल मालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केले आहे.
पुणे पोलिसात बागबान हॉटेलचे मालक फजल युसुफ बागवान आणि अहते शाम आयाज बागवान या दोघांनावर मटण विक्रेत्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या मटण विक्रेत्याचे दुकाने हे पुण्यातील लष्कर पोलिसांमध्ये हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मटण विक्रत्याचे दुकान पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या शिवाजी मार्केट येथे आहे.
या हॉटेलमध्ये मांसाहार खाण्यासाठी पुणेकर नेहमीच गर्दी करतात. पण हॉटेल मालकावर मटणाची उधारी न दिल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची ही पहिलीच घटना आहे.