Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता : राणे

Narayan Rane on Eknath Shinde issue
, मंगळवार, 21 जून 2022 (14:47 IST)
शिवसेना पक्षातील ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठे सूचक वक्तव्य केले आहे. योग दिनानिमित्त पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या नारायण राणे यांनी कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना राज्यातील घडामोडींवर भाष्य केले. तेव्हा त्यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याच्या प्रश्वावर नारायण राणेंनी आपलं मत व्यक्त करत म्हटले की, एकनाथ शिंदे सध्या कुठे आहेत, हे सांगावं लागत नाही. ते नॉट रिचेबल असण्यामागे काय अर्थ आहे, असा उलट प्रश्न त्यांनी केला. तसेच त्यांनी ट्विट करतही एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय. शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता, असंही राणे म्हणाले आहेत.
 
कार्यक्रमादरम्यान नारायण राणे यांनी कॉंग्रेसवर सुद्धा टीका केली आहे. तसेच आता देशात हा पक्ष संपत चालला आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्रिस्टियानो रोनाल्डोच्या कारला अपघात, 16.25 कोटींच्या कारचा चक्काचूर