पुणे शहरात दहशत निर्माण करून परदेशात फरार झालेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुणे पोलिसांनी निलेशच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांनी घायवळच्या कोथरूड परिसरातील दोन घरांवर छापा मारला आणि घरातून जिवंत काडतुसे जप्त केली.
घायवळ कडे कोणताही शस्त्र परवाना नसून देखील त्याच्याघरात जिवंत काडतुसे आढळल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घायवळचा पुण्यात काही मोठं करण्याचा कट होता का याचा तपास पुणे पोलीस करत आहे.
आरोपी गुंड निलेशला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी निलेशच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील घरी छापेमारी केली होती. तेव्हा पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र कोथरूडच्या घरातून जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.