पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या बीएससी च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओम कापडणे असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
ओम हा नाशिकचा राहणारा होता. तो विष्णू कुंज वसतिगृहात राहत होता. त्याने गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्यांचे कारण अद्याप कळू शकले नाही.
या घटनेची माहिती मिळतातच त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या पूर्वी त्यांच्या मृत्यू झाला. घटनास्थळी कोणतीही चिट्ठी पोलिसांना सापडली नाही. चतुर्श्रुंगी पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरु केले आहे.