Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pune : पुण्यात वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल

case has been registered
, रविवार, 3 सप्टेंबर 2023 (16:01 IST)
Pune :संभाजी भिडे गुरुजी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी घातलेल्या सभेत ते असे काही बोलून जातात ज्यामुळे वादग्रस्त होतात. आता पुन्हा संभाजी भिडे गुरुजींच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भिडे गुरुजींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यातील कोलवडी येथे एका मंगल कार्यालात भिडे यांचा जाहीर सभेच आयोजन करण्यात आलं होत. त्या सभेत त्यांनी राष्ट्रीय ध्वज तिरंगेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले असून त्यांच्या या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांच्या व सभा आयोजकांच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आपल्या या जाहीर सभेत त्यांनी इंडिया आघाडीची मुंबईत झालेल्या बैठकीसाठी देखील त्यांनी कौरवांच्या वंशाची बैठक असल्याचे वक्तव्य केले आहे. आता भिडे गुरुजींना या वक्तव्यामुळे कोणत्या नव्या वादाला समोरी जावे लागणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Cup India Squad Update:वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होणार, राहुलचे स्थान निश्चित!