Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अबब, पुण्यात अज्ञात प्राण्याचे प्रचंड मोठ्या आकाराचे अवशेष आढळले

अबब, पुण्यात अज्ञात प्राण्याचे प्रचंड मोठ्या आकाराचे अवशेष आढळले
, गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (16:20 IST)
पुण्यामध्ये स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रोच्या मार्गाचे खोदकाम सुरु आहे. याच खोदकामादरम्यान मंडई परिसरामध्ये अज्ञात प्राण्याचे प्रचंड मोठ्या आकाराचे अवशेष आढळून आले आहे. हे अवशेष किमान दोन हजार वर्षांपूर्वीचे असावेत असा अंदाज पुरातत्व विभागातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. 
 
सापडलेल्या हाडांचा आकार सामान्य प्राण्यांच्या सांगाड्यातील हाडांपेक्षा मोठा आहे. प्रथम दर्शनी ही हाडं हत्तीची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या ठिकाणी ही हाडं सापडली त्या खोदकामाच्या ठिकाणाला पुरातत्व खात्यामधील जाणकार आणि इतिहास संशोधकांनी भेट दिली आहे. या हाडांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच त्यांचे रहस्य उलगडण्यास मदत होईल असं सांगितलं जातं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जर्मनीमध्ये लॉकडाउन 20 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला, 5 मेनंतर युकेमध्ये मृत्यूची सर्वाधिक संख्या आहे