rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे पूल अपघाताची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

ajit pawar
, सोमवार, 16 जून 2025 (13:03 IST)
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणीनदीवर जीर्ण पूल कोळलून 4 जणांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखींच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे. तसेच अपघातात जखमी झाल्यावर उपचाराचा खर्च सरकार करण्याचे जाहीर केले आहे. 
ही घटना दुर्देवी, वेदनादायी, असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तसेच या अपघाताची चौकशी करून दोषींच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 
ALSO READ: पुणे पूल अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार कडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर
रविवारी झालेल्या या अपघातात काही नागरिक आणि पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळतातच स्थानिक नागरिकांनी व स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव व मदतकार्य सुरु केले. नंतर जिल्हा प्रशासन, एनडीआरएफचे दल देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य सुरु केले. 
ALSO READ: पुण्यात इंद्रायणी नदीवर बांधलेला पूल कोसळला, 4 जणांचा मृत्यू
यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, कुंडमळा  येथे अपघातस्थळी स्थानिक प्रशासन ने तातडीने मदत व बचाव कार्य सुरु केले असून अपघातात जखमी झालेल्या पर्यटकांना व नागरिकांना सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अपघातग्रस्त पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून अपघाताची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून या प्रकरणात कोणतेही दुर्लक्ष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 
 
या संकटाच्या काळात राज्य सरकार बाधितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून जखमींना आवश्यक मदत दिली जाईल.अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन अजित पवारांनी नागरिकांना केले आहे. 
Edited By - Priya Dixit
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: पुण्यात पॅसेंजर ट्रेनच्या डब्यात आग लागली, प्रवासी घाबरले