पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आत पुण्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे १ डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुणे जिल्ह्यातील करमणूकीच्या कार्यक्रमांबाबतही पवारांनी भाष्य केलं. पुण्यात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात आली असल्याने १ डिसेंबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पुण्यातील भिमथडी जत्रेला डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यात परवानगी देण्यात आली असून सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारखे कार्यक्रमही सर्व नियमांचे पालन करून होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवनागी देण्यात आली. सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्यासंदर्भात नवी नियमावली तयार करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्यात खुल्या मैदानावर सांस्कृतिक सामाजित कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी देखील परवानगी देण्यात आली.