Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

Curfew
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधातील आंदोलनांना प्रतिसाद म्हणून आणि सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर, पुण्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २६ मे पासून १४ दिवसांसाठी अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींसंदर्भात विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर, पुणे प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत कोणत्याही प्रकारचे आंदोलन, निदर्शने, मिरवणूक किंवा सार्वजनिक मेळाव्यावर पूर्णपणे बंदी असेल.
 
पुणे पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७(१)(२)(३) अंतर्गत हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. आगामी बकरीद आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुरक्षा राखण्यासाठी पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
 
पुणे पोलिसांनी जनतेला या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
वाढत्या इंधन दरवाढीच्या आणि वाहनांच्या अतिरिक्त वापराच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी सर्व विभागप्रमुखांना इंधन बचतीच्या सूचना जारी केल्या आहे. त्यांनी असा सल्ला दिला आहे की, पालिकेची वाहने केवळ अत्यावश्यक कामांसाठीच वापरावीत आणि प्रवासाचे योग्य नियोजन करावे. पालिकेच्या आदेशात म्हटले आहे की, पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियमच्या किमती सतत वाढत आहे.
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: कोल्हापूरमधील मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरून सुशांत शेलार आणि सुषमा अंधारे यांच्यात शाब्दिक चकमक