Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pune: एकतर्फी प्रेम प्रकरणातून MPSC तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने हल्ला, आरोपीला अटक

crime
, बुधवार, 28 जून 2023 (12:30 IST)
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त वाढत आहे. काही दिवसांपूर्वी MPSC ची विद्यार्थिनी दर्शना पवार हिची निर्घृण हत्या करण्यात आली. आता एकतर्फी प्रेम प्रकरणातून पुण्यातील सदाशिव पेठ येथे MPSC करणाऱ्या तरुणीवर MPSC करत असलेल्या तिच्या मित्राने कोयत्याने हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 
काही दिवसापूर्वी राजगडाच्या पायथ्याशी एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्येचे प्रकरण आताच ताजे असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे घडत असताना मुलीसोबत आणखी एक मित्र होता. हल्ला झाल्यानंतर तरुणी जखमी अवस्थेत धावत होती. आणि तरुण तिच्या मागे कोयता घेऊन धावत होता. एवढ्यात लेशपाल जवळगे नावाच्या तरुणाने कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार तेवढ्यात कोयता पकडला आणि हल्लेखोर युवकाला रोखले. नंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला.
या घटनेनंतर पोलीसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतल असून अधिक तपास करत आहे.
 
 
 
 
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जळगाव : मुलीने फडणवीसांना लावला पायाने टिळा, फडणवीस भावुक झाले