मुलींची देशातील पहिली शाळा पुण्याच्या ज्या भिडे वाड्यात सुरु झाली होती. तोच भिडे वाडा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महानगरपालिकेने जमीनदोस्त केला.
मध्यरात्री पोलिसांच्या बंदोबस्तात पुणे महानगरपालिकाने पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाड्याचा ताबा घेतला. महिन्याभरात पोटभाडेकरूंनी भिडेवाड्यातील ताबा सोडला नाही तर महानगरपालिका बळाचा वापर करून वाड्यावरील ताबा मिळवू शकते असे आदेश सुप्रीम कोर्टाने देत भाडेकरूंची याचिका फेटाळली.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, पुणे महानगरपालिकेने भिडे वाड्याचा ताबा घेत मोठ्या पोलीस बंदोबस्तात मध्यरात्री
ऐतिहासिक भिडे वाडा जमीनदोस्त केला.
भिडे वाड्याच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जेचे स्मारक होणार असल्याचे सांगण्यात येत असून हे स्मारक कधीपर्यंत उभारले जाणार हे पाहावे लागणार आहे.